झाडाला गळफास घेऊन वडाळा येथील तरुणाची आत्महत्या

ऑक्टोबर 21, 2021 1:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । भडगाव तालुक्यातील मळगाव शिवारात वडाळा येथील ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या  एकच हळहळ व्यक्त होत आहे. नवल गंगाधर सूर्यवंशी असे मृताचे नाव आहे.

crime 1 jpg webp

याबाबत असे की, बुधवारी सकाळी ७ वाजेपूर्वी मळगाव शिवारातील शेतात झाडाला नवल सूर्यवंशी यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. याबाबत मळगाव येथील रहिवासी भाऊसाहेब जगन्नाथ जाधव यांच्या खबरीवरून येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

घटनेचा तपास सहाय्यक फाैजदार छबूलाल नागरे करत आहेत. दरम्यान दुपारी जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबची टीमने श्वानाच्या मदतीने पाहणी केली. दुपारीच पाेेलिस निरीक्षक अशाेक उतेकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. तर रात्री एलसीबीच्या पथकाने तालुक्यात येऊन चौकशी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now