भोजे येथील तरुणाने घेतला गळफास

ऑक्टोबर 9, 2021 10:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. दरम्यान पाचोरा तालुक्यातील भोजे येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश संतोष पवार (वय – ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाहीय. या प्रकरणी घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

याबाबत असे की, भोजे येथील योगेश पवार याने आज दि. ९ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेप्रसंगी घरात कोणीही नव्हते. त्याचे  आई व वडिल बाहेर गेलेले होते. काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर त्यांना योगेश हा घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. डिगंबर थोरात हे करीत आहे. मयत योगेश पवार याचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. योगेश पवार याने आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now