जळगाव जिल्हा

रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य राजेंद्र सोनवणे याने विभागीय आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

स्पर्धेत आदित्यने ४०० पैकी तब्बल ३९५.७ गुण मिळवत नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची नागपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्यामुळे आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही आदित्यकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.आदित्यच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button