रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्ती ठार ; मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

नोव्हेंबर 6, 2021 12:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील शिवकॉलनी उड्डाणपूल परिसरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, मयत व्यक्तींची ओळख पटविण्याचे आवाहन रामानंदनगर पोलिसांनी केले आहे.

crime

याबाबत असे की, जळगाव शहरातील शिवकॉलनी उड्डाणपुला जवळ अप रेल्वेलाईनवर खंबा क्रमांक ४१७ /२०- १८ जवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती शिरसोली येथील स्टेशन मास्तर कमलेश सिन्हा यांनी रामानंदनगर पोलिसांना कळविली. त्यानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक जितेंद्र तांबडे पोलिस कॉन्स्टेबल इकबाल पिंजारी पंकज पाटील या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी जळगाव रेल्वे स्टेशनची उपप्रबंधक यांच्या खबरीवरून  रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे हे करीत आहेत

मयताचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्ष असुन मजबूत जाडसर बांधा रंग गोरा उंची १६० सेंटीमीटर तर अंगात निळी जीन्स पँट व पांढऱ्या रंगाचा नक्षी असलेला शर्ट तसेच पांढरा  बनियान व तपकिरी रंगाची अन्डर पँट  असे मयताचे वर्णन आहे. घटनास्थळी मयताची स्पार्क कंपनीची चप्पल तसेच पांढरा हातरुमाल मिळून आला आहे. या वर्णनानुसार मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रामानंदनगर पोलिसांनी केले आहे. कोणालाही मयताची ओळख पटल्यास त्यांनी रामानंदनगर पोलिसांशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now