महावितरणचा अजब प्रकार : हातगाडी मजुराला ८४ हजार रुपयांचे बिल

जळगाव लाईव्ह न्युज । २८ मे २०२२ । जामनेर शहरातील हिवरखेडा येथील रहिवासी असलेले लताबाई गुणांक यांना महाराष्ट्र राज्य विदयुत कंपनी मर्या. यांचे कडून ८४ हजार २५० रुपये असे बिल पाठवण्यात आले असल्याने सदरचे मीटर वापर कर्ते यांना पाठवण्यात आलेल्या बिलामुळे चाललेल्या बोगस कारभारा बाबत चर्चेचा विषय आहे.


सदरचे मीटर वापर कर्ते हे सरकारी दवाखाना येथे १ छोटीशी चहा दुकान, बिर्यानी टपरी लावून पती,पत्नी अश्या दोघांचे पोट भरत असतात आम्ही न चुकता आमचे घरचे लाईट बिल भरत असतो या वेळेस ८४,२५० इतके बिल आम्हाला पाठवले. आम्ही कुठून भरू, दिवसभर जे काय विकले जाइल त्यावर आमचा पोट पाणी चालत आम्ही जामनेर शहरातील जळगाव रस्त्यावरील विदयुत विभागा कडे गेलो होतो त्या साहेबानी साडेतीन हजार भरायचे सांगीतले. तस काही तरी लिहून दिल आहे, पण तेही दयाव कूठून अश्या प्रतिक्रिया संबधीत मिटर कर्ते यांनी बोलतांना व्यक्त केल्या आहेत जे अकोडे टाकतात, बिल भरता नाही फूकट वापरतात वीज चोरी करतात त्यांचे कडे लक्ष नाही देत .

आमचे सारख्या गरिबाचा छळ का ? अश्या संतप्त भावना यावेळी उपस्थित केल्या जामनेर शहरातील मीटर रिडींग घेणारे कंत्राटर व त्यांचे नेमलेले माणसे शुद्धीवर रिडींग घेतात किंवा कसे ? याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. जामनेर शहरातील बरेचसे विदयुत मीटर वापरत कर्ते यांचे कडे येणारे मनमानी बिला बाबत प्रचंड लेखी व तोंडी तक्रारी आहेत याकडे केराची टोपली विदयुत विभागा कडून दादावली जात आहे. याकडे राजकीय लोक प्रतिनिधी यांनी लक्ष जाणीव पुर्वक द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.