⁠ 
[rank_math_breadcrumb]

धक्कादायक ! महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२५ । हिंदू धर्मीयांचा धार्मिक सोहळा असलेला महाकुंभ मेळावा यंदा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरणार आहे. १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा महाकुंभ मेळावा पार पडणार असून यासाठी देशातील कान्याकोपऱ्यातून भक्त प्रयागराज येथे महाकुंभ मेळावासाठी जात आहे. याच दरम्यान, महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करून बी6 कोचमधील काचेच्या काचा फुटल्या. ही घटना जळगावमध्ये घडली. त्यामुळे डब्यातील लहान मुले व महिलांसह प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज महाकुंभ प्रयागराज ट्रेन, ताप्ती गंगा ट्रेन सुरतच्या उधना रेल्वे स्टेशनवरून निघाली होती. महाकुंभमेळ्यापूर्वी या ट्रेनमधून मोठ्या संख्येने भाविक शाही स्नानासाठी सुरतहून निघाले. बी6 कोचमधून सुरतचे भाविक प्रवास करत होते. या कोचमध्ये पाच मुले, सहा वृद्ध, 13 महिला आणि 12 पुरुष होते. हे सर्व सुरतचे भक्त होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त ट्रेनमधील 45% लोक कुंभासाठी प्रयागराजला जात आहेत.

ताप्ती गंगा ट्रेन उधना येथून निघून महाराष्ट्रात जळगावमधून जात होती. यादरम्यान रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे बी6 कोचमधील काचेच्या काचा फुटल्या. डब्यातील लहान मुले व महिलांसह भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेमुळे दोन ते तीन तास या प्रकरणाची माहिती कोणालाच मिळाली नसल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.