⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

शेअर बाजारात भूकंप : सेन्सेक्स १५४५ अंकांनी घसरला तर निफ्टी १७१५० पर्यंत खाली

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । शेअर मार्केटसाठी आजचा दिवस भूकंप करणारा ठरला आहे. आजच्या दिवशी शेअर बाजारात शेअर्सची झपाट्याने विक्री झाल्याचं दिसून आलं. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स १५४५ अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही ४६८ अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये २.६२ टक्क्यांची घसरण होऊन तो ५७४९१.५१ वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये २.६६ टक्क्यांची घसरण होऊन तो १७,१४९.१० वर पोहोचला आहे.

ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अँड गॅस, बँक आयटी, फार्मा आणि रिऍलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं या शेअर्सच्या किंमतीत २ ते ६ टक्क्यांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. मंगळवारी शेअर बाजारात JSW Steel, Bajaj Finance, Tata Steel, Grasim Industries आणि Hindalco Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून Cipla and ONGC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये काहीशी वाढ झाली आहे.

सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स १२०० अंकांनी कोसळला होता. निफ्टीतही घसरण दिसून आली. जागतिक बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला. ही घसरण दुपारच्या सत्रातही कायम राहिली. अमेरिकेत मध्यवर्ती बँकेकडून व्याज दर वाढवण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारात मोठा दबाव निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांकडून सपाट्याने विक्री सुरू झाली.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

Cipla- 2.84 टक्के
ONGC- 1.25 टक्के
Bandhan Bank- 4.00 टक्के
Lupin- 2.00 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

JSW Steel- 6.67 टक्के
Tata Steel- 6.03 टक्के
Bajaj Finance- 5.99 टक्के
Grasim- 5.66 टक्के
Hindalco- 5.59 टक्के

हे देखील वाचा :