नात्याला कलंक : बापानेच केला पोटाच्या मुलीवर अत्याचार

जुलै 4, 2022 12:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सावत्र आई बाळंपणासाठी माहेरी गेल्याची संधी साधून नराधम बापाने पोटच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीला मासिक पाळी न आल्याने हा प्रकार समोर आला आहे. मासिक पाळी न आल्याने मुलीची आजी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथे गेल्यावर मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या आजीने तिला घेऊन पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल केला आहे.

crime 18 jpg webp

औरंगाबाद जिल्ह्यातील एका तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सावत्र आई, वडील, आजी, आजोबा आणि लहान भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. सहा महिन्यापुर्वी पिडीत मुलीची सावत्र आई ही गर्भवती असल्याने ती तिच्या माहेरी गेलेली होती. तर पिडीत मुलीचे आजी व आजोबा हे नगर येथे डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी गावाला गेले होते. त्यावेळी घरी पिडीत मुलगी, तिचा लहान भाऊ आणि तिचे वडील हे तिघे घरीच होते. एके दिवशी रात्री तिघांनी जेवण केल्यानंतर झोपले होते. त्यावेळी पिडीता झोपलेली असतांना तिचा बाप तिच्या जवळ येवून तिचे तोंड दाबून अत्याचार केला. हा प्रकार त्याने तीन ते चार वेळा केला.

दरम्यान, पिडीत मुलीची आजी घरी आल्यावर हा प्रकार सांगितला. त्यावेळी पिडीते मुलीच्या आजीने नराधम बापावर घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. गेल्या महिन्यात पिडीत मुलीला मासिक पाळी आली नाही म्हणून तिची आजी ही पिडीतेला घेवून पाचोरा येथील खासगी रूग्णालयात घेवून गेली असता ती गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर पिडीत मुलीला तिच्या आजीने जळगाव गाठले, त्यानंतर हा प्रकार जिल्हापेठ पोलीसांना रविवार ३ जुलै रोजी कळल्यानंतर त्यांनी धाव घेतली. बालकल्याण समितीचे पत्र आणि पिडीत मुलीच्या जबाबावरून सरकारी फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर यांच्या फिर्यादीवरून नराधम बापावर सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now