⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याबाबत निवेदन


जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करुन त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी यासाठी एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात यवतमाळ जिल्ह्यातील घाटं जी तालुक्यातील पारवा या गावातील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार १५ मे रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली असल्याचे म्हटले असुन सदर हत्या माहिती अधिकार अधिनियम नुसार माहिती मागितली म्हणुन सुड भावनेने झाली असल्याचे पोलीस तपासातून व प्रसारमाध्यमातून समोर आले असल्याचे म्हटले आहे तसेच सदर घटना ही धक्कादायक असुन महाराष्ट्राच्या प्रागतिक परंपरेला काळीमा फासणारी असल्याचे म्हटले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे मनोधैर्य खच्चिकरण करणारी घटना असुन यासाठी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना सहा महिन्याच्या आत कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, याप्रकरणातील सामील असू शकणारे व अपराध्याला चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्या देखील मुसक्या अवळून त्यांची चौकशी व्हावी, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यासाठी धोरणात्मक उपाय योजना अमलात आणून शासनाने या संबंधी कडक उपाय योजना कराव्यात तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते यांना आवश्यक येथे तडक पोलीस संरक्षण मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर सक्रिय सभासद राजधर महाजन, मुख्य संघटक नितीन ठक्कर, संघटक उमेश महाजन, मुख्य सल्लागार भुषण चौधरी, सिताराम मराठे, ऍड.मोहन शुक्ला, बबन पाटील यांच्या सह्या आहेत.