गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर ; जाणून घ्या

जून 29, 2021 4:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ ।  गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची ठेवण्यात आली आहे.

ganpati god

यंदा गणेशोत्सवासाठी गणपतींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी विनंती गणेशोत्सव मंडळांनी केलेली असताना कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करताना 4 फुटापर्यंत गणेशमूर्तीची उंची असावी, अशाप्रकारच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या.  

गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

– गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.

– कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.

– सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी

– विसर्जन कृञिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.

– नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.

– शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.

सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत

– आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.

– नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.

– गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now