बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! महाराष्ट्रातील एसटी प्रवास महागला, आजपासून नवीन दर लागू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी (ST) बसेस हा एक महत्त्वाचा वाहतूक साधन असतो, पण आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण एसटी महामंडळाच्या (ST Corporation) १५ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे.

एसटी महामंडळाकडून 15 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाऱ्या बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे. परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक ढाली. या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली.

आजपासूनच एसटीच्या नवीन तिकिट दर लागू होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. या नवीन दरवाढीमुळे प्रवासी सरासरी ७० ते ८० रुपयांनी जास्त पैसे मोजावे लागतील. उदाहरणार्थ, आतापर्यंत १०० रुपयांना मिळणारे तिकीट आता ११५ रुपयांना मिळेल.

एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी ही भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या खिशाला चाप बसणार आहे, कारण त्यांना आता प्रत्येक प्रवासासाठी जास्त पैसे द्यावे लागतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button