जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२५ । तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कॉन्स्टेबल जीडी परीक्षा २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे तब्बल 25487 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. SSC GD Constable Recruitment 2025

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) आणि आसाम रायफल्समध्ये एसएसएफ आणि रायफलमन (जीडी) या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करावेत. SSC GD Constable Bharti 2025

पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) | 25487 |
| Total | 25487 |
फोर्स नुसार तपशील:
| अ. क्र. | फोर्स | पद संख्या |
| 1 | Border Security Force (BSF) | 616 |
| 2 | Central Industrial Security Force (CISF) | 14595 |
| 3 | Central Reserve Police Force (CRPF) | 5490 |
| 4 | Sashastra Seema Bal (SSB) | 1764 |
| 5 | Indo-Tibetan Border Police (ITBP) | 1293 |
| 6 | Assam Rifles (AR) | 1706 |
| 7 | Secretariat Security Force (SSF) | 23 |
| Total | 25487 |
वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते १३ वर्षे आहे. उमेदवारांचा जन्म २ जानेवारी २००३ पूर्वी आणि १ जानेवारी २००८ नंतर झालेला नसावा. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
आवश्यक पात्रता:
या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून १०वी उत्तीर्ण केलेली असावी. कटऑफ तारीख १ जानेवारी २०२६ आहे, म्हणजेच ते या तारखेपूर्वी उत्तीर्ण झालेले असावेत.
वेतनश्रेणी : २१,७०० ते ६९,१०० रुपयांपर्यंत आहे.
अर्ज कसा करायचा
पायरी १: अधिकृत वेबसाइट – ssc.gov.in ला भेट द्या
पायरी २: ओटीआर पूर्ण करा आणि खाते तयार करा
पायरी ३: वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशीलांखाली कागदपत्रे भरा आणि अपलोड करा.
पायरी ४: तपशील तपासा, फी भरा आणि फॉर्म डाउनलोड करा.
परीक्षा फी :
या भरतीसाठी अर्ज शुल्क ₹१०० आहे. तथापि, महिला उमेदवार, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) उमेदवार तसेच पात्र माजी सैनिकांना एसएससीच्या आरक्षण आणि फी सवलत धोरणानुसार फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.












