⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | 12वी पाससाठी सर्वात मोठी संधी..! SSC मार्फत मेगाभरती सुरु, 92,300 पर्यंत पगार मिळेल..

12वी पाससाठी सर्वात मोठी संधी..! SSC मार्फत मेगाभरती सुरु, 92,300 पर्यंत पगार मिळेल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC CHSL परीक्षा 2023 ची अधिसूचना जारी केली असून त्यानुसार एकूण 1600 पदांवर ही भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 9 मे 2023 पासून सुरु झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2023 आहे. SSC CHSL Bharti 2023

ही पदे भरली जाणार?
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता : उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट : 18 ते 27 वयोगटातील उमेदवार या पदांसाठी  अर्ज करू शकतात.

ITI उत्तीर्णांसाठी रेल्वेत 548 पदांवर भरती

अर्ज फी
अर्जाची फी रु. 100 आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD), आणि माजी सैनिक (ESM) जे आरक्षणासाठी पात्र आहेत त्यांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

इतका पगार मिळेल?
कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

अर्ज कसा करावा
SSC च्या अधिकृत साईट ssc.nic.in वर जा.
पृष्ठाच्या शीर्षस्थानी उपलब्ध ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.
एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना CHSL लिंकवर क्लिक करावे लागेल.
आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि लॉगिन वर क्लिक करा.
अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
पूर्ण झाल्यावर सबमिट वर क्लिक करा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवा.

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.