सशस्त्र सीमा बलात 10वी पास तरुणांसाठी मोठी संधी! 404 पदांसाठी भरती, पगार 69100

मे 11, 2026 3:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. सशस्त्र सीमा बल (SSB) ने क्रीडा कोट्याअंतर्गत २०२६ च्या कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी-Sports Quota) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, सशस्त्र सीमा बल (एसएसबी) एकूण ४०४ पदांवर भरती करणार असून, यासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

ssb

या नोकरीसाठी इच्छुक पात्र उमेदवारांना SSBच्या अधिकृत वेबसाईट www.ssb.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०९ जून २०२६ पर्यंत असणार आहे. त्यापूर्वी इच्छुकांनी अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
क्रीडा पात्रता: (i) ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एखाद्या राज्याचे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे; किंवा (ii) वरिष्ठ (Senior) / कनिष्ठ (Junior) राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा (iii) ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ (१८ वर्षांवरील वयोगट), ‘खेलो इंडिया विंटर गेम्स’ किंवा ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ मध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा (iv) ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ मध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा (v) ‘स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SGFI) च्या स्पर्धांमध्ये पदके मिळवणारे खेळाडू; किंवा (vi) ज्या खेळाडूंनी ‘आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळां’द्वारे (Inter-University Sports Boards) आयोजित आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे; किंवा (vii) ज्या खेळाडूंनी ‘अखिल भारतीय शालेय क्रीडा महासंघा’द्वारे (All India School Games Federation) आयोजित शालेय स्तरावरील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्याच्या शालेय संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

वयाची अट : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 जून 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05+5 वर्षे सूट, OBC: 03+5 वर्षे सूट]
पगार : 21700/- ते 69100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now