जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२३ | हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट) जळगाव महानगर आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे भव्य कब्बडी स्पधेचे अयोजन करण्यात आले आहे. 21 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान तीन दिवस जळगाव शहरातील जी एस ग्राउंड (मैदान) वर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. सकाळच्या आणि रात्रीच्या सत्रात ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील विविध शहरातील स्पर्धक या ठिकाणी खेळण्यासाठी येणार आहेत. अहमदनगर, धुळे, मुंबई, बऱ्हाणपूर, शिरपूर, नंदुरबार या शहरातील स्पर्धक या ठिकाणी कबड्डी खेळणार आहेत. ३०० हून अधिक खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येऊन स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढवावे अशी विनंती स्पर्धेचे आयोजन शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे व उपमहानगर प्रमुख प्रशांत सूरडकर यांनी केली आहे. स्पर्धेसाठी क्रीडा रसिक मंडळ, नेताजी सुभाष क्रीडा मंडळ, महर्षी क्रीडा मंडळ, महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे. याच बरोबर नगरसेवक नितीन बर्डे, सुनील राणे , बन्सी माळी, आणि कमलेश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.
जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जि एस ग्राउंड वर हि स्पर्धा भरवली जाणार आहे. एकाच वेळी २ मॅटवर कबड्डीचा दम घुमणार आहे. प्रेक्षशकांसाठी ३ हजार क्षमतेची तात्पुरती गॅलरी बांधण्यात आली आहे. याचबरबर स्पर्धेत सर्वच गोष्टींचा बारकाईने विचार करण्यात आला असून कबड्डीपटूंना प्राथमिकता देण्यात आली आहे.