एरंडोलमध्ये जातीय सलोखा स्वाक्षरी अभियानास उस्फूर्त प्रतिसाद

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२२ । सामंजस्य सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव या मूल्यांची जपणूक करण्यासाठी एरंडोल येथील पोलीसां तर्फे ७मे रोजी जातीय सलोखा स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला एरंडोल वासियांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. माजी नगराध्यक्ष रमेश सिंग परदेसी यांनी प्रथम स्वाक्षरी करून अभियानाचा शुभारंभ झाला.

यावेळी एपीआय गणेश अहिरे, माजी नगरसेवक योगेश देवरे, शेनपडु वाडे, राजधर महाजन, बीएस चौधरी, उमेश महाजन, नितीन पाटील,कमरली सय्यद, ऍड. नितीन महाजन, डॉ. नरेंद्र पाटील, किशोर निंबाळकर, रवींद्र महाजन, जहिरोद्दीन सेट कासम, प्राध्यापक मनोज पाटील, शालिक गायकवाड, एजाज अहमद, प्रकाश चौधरी, गोटू ठाकूर, शेख रईस, परेश बिर्ला, रतिलाल पाटील, डॉ. सुधीर काबरा, गोकुळ वाल्डे, विषाल सोनार, मिलिंद कुमावत. अनिल पाटील ,अखिल मुजावर आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन पीएसआय शरद बागल यांनी केले. दरम्यान मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल सोनार यांनी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देऊन जातीय सलोखा राखण्यासाठी पाठिंबा देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.