जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२४ । रेल्वे गाड्यांना असलेली गर्दी आणि प्रवाशांकडून होत असलेली गाड्यांची मागणी पहाता, रेल्वे प्रशासनाकडून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येत आहे. यात हुबळी, ऋषीकेश, मुझफ्फरपूर या मार्गावर या गाड्या धावतील. यामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांची सुविधा होणार आहे.
रेल्वे विशेष चालणाऱ्या गाड्यांमध्ये हुबली ते योगनगरी ऋषिकेश दरम्यान, उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांच्या १० फेऱ्या होतील. यात ०६२२५ विशेष गाडी हुबली येथून २९ एप्रिल ते दि २७ मेपर्यंत दर सोमवारी रात्री ९.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता योगनगरी ऋषिकेश येथे पोहोचेल. या गाडीच्या ५ फेऱ्या होतील, तर ०६२२६ विशेष गाडी ऋषिकेश येथून २ ते ३० मे २०२४ पर्यंत दर गुरुवारी संध्याकाळी ५.५५ वाजता वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हुबली येथे पोहोचेल. या गाडीच्या सुध्दा ५ फेऱ्या होतील.
या स्थानकावर आहे थांबा
धारवाड, मिरज, सातारा, पुणे, दौड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, भोपाळ, बिना, मथुरा, हजरत निजामुद्दीन, मेरठ, गाजियाबाद, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुरकी, हरिद्वार
हुबळी-मुझफ्फरपूर विशेष गाडी
०७३१५ विशेष गाडी हुबली वेधून ३० ते २८ मे पर्यंत दर मंगळवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता मुजफ्फरपुरला पोहचेल, या गाडीच्या ५ फेऱ्या होतील, तर ०७३१६ विशेष गाडी मुजफ्फरपूरहून ३ ते २९ मे या काळात दर शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटेल, व तिसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता हुबळीला पोहचेल. या गाडीच्या ५ फेऱ्या होतील. ही गाडी विभागात मनमाड, भुसावळ व खंडवा येथे थांबणार आहे