जळगाव लाईव्ह न्यूज । 17 मार्च 2024 । होळी आणि धूलिवंदन सण आता काही दिवसावर येऊन ठेपला असून या सणाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात दानापूर, गोरखपूर, छपरा या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांमुळे स्थानिक प्रवाशांची सोय होणार आहे.
यात ०१४७१ पुणे ते दानापूर विशेष गाडी गुरुवारी (दि. २१ मार्च) पुणे येथून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर येथे सकाळी ११.४० वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात २२ रोजी दानापूरहून दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पुण्यात संध्याकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी विभागात मनमाड, भुसावळ, खंडवा येथे थांबणार आहे. तसेच ०१४२१ पुणे ते गोरखपूर विशेष गाडी २२ मार्चला पुणे येथून दुपारी ४.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी गोरखपूर येथे रात्री ९ वाजता पोहचेल. २३ रोजी गोरखपूर येथून रात्री ११.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुण्यात सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल.
०९०८३ मुंबई ते गोरखपूर विशेष गाडी २२ रोजी मुंबईहून रात्री १०.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी गोरखपूर येथे सकाळी ९.३० वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दि. २४ मार्चला गोरखपूरहून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मुंबई येथे रात्री १२.४० वाजता पोहोचेल
तसेच मुंबई ते दानापूर मार्गावर सुध्दा ०१२१५ मुंबई ते दानापूर विशेष गाडी २१ मार्चला मुंबई येथून ११.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दानापूर येथे दुपारी २ वाजता पोचेले. दि. २२ मार्चला दानापूरहून संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मुंबईला सकाळी ३.५० वाजता पोचेल. ही गाडी नासिक, भुसावळ, खांडवा येथे थांबणार आहे. ०५१९४ पनवेल ते छपरा विशेष गाडी २२ व २९ मार्चला पनवेल येथून रात्री ९.४० वाजता सुटेल तिसऱ्या दिवशी छपरा येथे सकाळी ८.५० वाजता पोहचेल. २१ व २८ मार्चला छपराहून दुपारी ३.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पनवेलला दुपारी ३.२० वाजता पोहचेल. नासिक, भुसावळ, खांडवा येथे थांबणार आहे. या गाड्यांचे आरक्षण १६ मार्चपासून सुरू झाले.