जळगाव शहर

दीपस्तंभ-मनोबल फाउंडेशनच्या मेळाव्यास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । दीपस्तंभ व मनोबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित माहेर मेळावा आणि माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच सौ. सानिका धिवरे यांनी सदिच्छा भेट देत उपस्थितांशी संवाद साधला.

दीपस्तंभ व मनोबल फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे कार्य केले जाते. या उपक्रमांत सहभागी विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व सौ. सानिका धिवरे यांनी संवाद साधला.

यावेळी उपस्थितांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. माहेर मेळावा हा आपुलकी, स्नेह आणि भावनिक नात्यांना उजाळा देणारा ठरला, तर माजी विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळत विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीने सामाजिक योगदानाची भावना निर्माण झाली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दीपस्तंभ व मनोबल फाउंडेशनच्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळतो, कार्यक्रमात उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण आनंदी आणि आपुलकीचे झाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button