जळगाव जिल्हा

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

नर्सिंग विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव लाईव्ह न्यूज । महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छतेच्या संदेशाच्या अनुषंगाने गोडावरी फाउंडेशन संचालित डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या संकल्पनेतून विकास विद्यालय, जळगाव खु. येथे स्वच्छता जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.

या उपक्रमात बी.एस्सी. नर्सिंगच्या तृतीय सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी विकास विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य (स्किट) सादर करत वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व, कचर्याचे योग्य व्यवस्थापन तसेच स्वच्छतेचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.पथनाट्यातून स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असावी, असा संदेश देण्यात आला. विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेचे महत्त्व जाणून घेतले.

‘स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे’ हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य शिवानंद बिरादार, तसेच अस्मिता जुमडे, सुमित भारंबे, मंजिरी मडावी, वैभव खरे, श्रुती गोरले, निकिता कोळसे, प्रसाद कचोरे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विकास विद्यालयाचे प्राचार्य युवराज पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेची भावना वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button