⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

विरावली स्मशानभूमीत पोहोचला सौर हायमास्ट लॅम्पचा उजेड

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । विद्यमान शिक्षण व आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरावली येथील स्मशानभूमीत सौर हायमास्ट लॅम्प बसविण्यात आला.

या प्रसंगी यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष व छत्रपती फाऊंडेशन अध्यक्ष तथा विरावली ग्रा.पं.सदस्य ऍड देवकांत पाटील, माजी ग्रा.प. सदस्य तथा उपतालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पवन पाटील, माजी ग्राप सदस्य रणधीर पाटील, विरावली पीक संवरक्ष चेअरमन अर्जुन पाटील,  विकासो माजी चेअरमन संजय पाटील, माजी उपसरपंच यशवंतराव पाटील, प्रगशील शेतकरी मनीष पाटील, गणेश पाटील, विकासो संचालक शरद राजपूत, पीक सवरक्षणं संचालक गोरख पाटील सामाजिक कार्यकर्ते संजू तडवी, विकासोचे संचालक गुलाब पाटील, छत्रपती फाऊंडेशन संचाकल प्रल्लद पाटील, भूषण धनगर, प्रताप पाटील, चेतन पाटील, देवेंद्र पाटील, राकेश पाटील, विनोद पाटील, राहुल पाटील, पवन धनगर, राजेश अडकमोल, योगेश पाटील, संजू पुना पाटील, संजू अडकमोल, सुभाष पाटील, सुमेसिंग पाटील, सचिन पाटील, राजू पाटील, नरेश धनगर, आदी उपस्थित होते.

दरम्यान, विरावली येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी खूप अंधार होत होता. यापूर्वी तेथे लाईटची व्यवस्था नव्हती. रात्री जर प्रेत यात्रा निघाली तर मोबाईल ची बॅटरी, ट्रॅक्टर किंवा इतर वाहनांच्या माध्यमातून जुगाड लावला जात होता. परंतु काही दिवसापूर्वी सभापती रविंद्र पाटील यांना ग्राप सदस्य ऍड देवकांत पाटील यांच्यासह ग्राप सदस्य शोभा पाटील, ग्रापसदस्य शकुंतला पाटील, ग्राप सदस्य हमीदा तडवी, माजी सदस्य  पवन पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती.

त्यानुसार आज सोमवारी विरावली गावासाठी त्यांच्या जिप सदस्य या निधीतून सौर हायमास्ट लॅम्प बसवला.  यावेळी ऍड देवकांत पाटील आणि विरावली पीक संवरक्षणचे चेअरमन यांनी नारड फोडून त्या सौर हायमास्ट लॅम्पचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. याबद्दल गावकऱ्याच्यावतीने सभापती रवींद्र पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सौर हायमास्ट लॅम्प दिल्याबद्दल आभार मानले.