---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

स्मिताताई वाघ यांनी घेतले सुरेशदादा जैन यांचे आशीर्वाद

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२४ । जळगाव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांनी ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या भेटीत सुरेशदादा जैन यांनी स्मिताताईंना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी जळगाव शहराच्या विकासावर चर्चा केली. रेल्वे, विमानतळासह अनेक विषय केंद्र सरकारशी निगडीत आहे. ज्यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा केला तर जळगाव शहराच्या झोळीत खूप काही पडू शकते, अशी चर्चा यावेळी झाली.

BJP 1 jpg webp

यावेळी बोलतांना सुरेशदादा म्हणाले की, लोकसभा मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन वेगळे असते, तेथील प्रश्न देखील विविध स्वरूपाचे असतात. या समस्या सोडवण्यावर लक्ष दिले पाहिजे. सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या योजनांमध्ये केंद्र सरकारचाही वाटा असतो. यासाठी केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा करावा लागतो. स्मिताताई तुम्ही जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचे चित्र बदलण्याची क्षमता जिल्हा परिषदेत असते. तेथे तुम्ही तुमच्या कार्याचा ठसा उमटविला आहे, अशा शब्दात त्यांनी स्मिताताईंच्या कामाचे कौतूक केले. यावेळी स्मिताताईंच्या कन्या भाजयुमो युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी पलांडे देखील उपस्थित होत्या.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---