प्रचारादरम्यान स्मिताताईंचे शहरात ठिक ठिकाणी स्वागत !

एप्रिल 27, 2024 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी जळगावनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिरात प्रचाराचे नारळ फोडले. यानंतर श्रीराम मंदिरापासून सुरू झालेला त्यांचा प्रचार दौरा बळीराम पेठेतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाजवळ संपन्न झाला. दरम्यान, या प्रचारादरम्यान शहरात ठिकठिकाणी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत झाले असून यावेळी कमळच फुलणार असा विश्वास नागरिकांनी दर्शविला आहे.

smita wagh prachar jpg webp

यांची होती उपस्थिती :
स्मिताताई वाघ यांच्या जुन्या जळगावमधील प्रचार दौऱ्यावेळी आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, महानगर उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, माजी महापौर सीमा ताई व भारती सोनवणे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेशाम चौधरी, विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी तसेच दीपक सूर्यवंशी, सुनील शेळके, कैलास सोनवणे, अरविंद देशमुख, अमित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, आशुतोष पाटील, मुकुंद मेटकर, आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अमित भाटिया, किशोर चौधरी, सरोज पाठक, चंदन महाजन, डॉ. विरन खडके, अमित काळे, सुचिता हाडा, दिपमाला काळे, प्रकाश बालाणी, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, दीप्ती चिरमाडे, भाग्यश्री चौधरी, रंजना वानखेडे, लीला चौधरी, मुकुंदा सोनवने, ललित बडगुजर, चेतन सनकत, जितेंद्र मराठे, मयूर कापसे, प्रवीण कोल्हे, महेश पाटील, आनंद सपकाळे, नितीन इंगळे, महेश जोशी, अजित राणे, राहुल घोरपडे, जयेश ठाकूर, पियुष कोल्हे, शक्ती महाजन, विकी सोनार, रियाझ शेख, मयूर शिंपी, मिलिंद चौधरी, धनंजय चौधरी आदींसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now