जळगाव लाईव्ह न्यूज । अनेक जण भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आतापासूनच गुंतवणूक करत आहे. जेणे करून भविष्यात पैशांसाठी कुणावर अवलंबून राहावे लागणार नाही. तर काहींचे करोडपती होण्याचे स्वप्न असते. त्यासाठी असे लोक गुंतवणुकीच्या विविध पद्धती अवलंबत आहेत.काही लोक सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून अधिक सुरक्षिततेसह हे ध्येय साध्य करू इच्छितात, तर काही लोक अधिक जोखीम घेऊन कमी वेळात करोडपती होण्याचे स्वप्न पाहतात. तथापि, एसआयपी हे असेच एक माध्यम आहे, जे कमी जोखीम आणि काही वेळेत तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते.

तुम्ही एसआयपीद्वारे छोट्या रकमेपासून गुंतवणूक करून तुमचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात. एसआयपीचा प्रमुख फायदा म्हणजे यामध्ये कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो. यामुळं तुम्ही जितका काळ गुंतवणूक कराल तितका वेळ तुम्हाला कम्पाऊंडिंगचा फायदा मिळेल. 3000 रुपये, 4000 रुपये किंवा 5000 रुपयांच्या एसआयपीनं अडीच कोटी रुपयांचा कॉर्पस कसा उभारायचा हे जाणून घेणं आवश्यक आहे.
तुम्ही दरमहा 3000 रुपये एसआयपीद्वारे गुंतवल्यास 37 वर्षानंतर अडीच कोटी रुपयांचा कॉर्पस तयार झालेला असेल. तुम्ही 1332000 रुपयांची गुंतवणूक कराल. त्यावर तुम्हाला भांडवली नफा 2 कोटी 34 लाख 91 हजार 534 रुपये मिळेल. म्हणजेच तुमचा कॉर्पस 2 कोटी 48 लाख 23534 रुपये असेल.
तुम्हाला चार हजारांच्या एसआयपीद्वारे अडीच कोटींचा कॉर्पस निर्माण करण्यास 35 वर्ष लागतील. तुम्ही 4000 च्या एसआयपीनं 35 वर्षात 1680000 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. 12 टक्के सीएजीआरच्या हिशोबानं 2 कोटी 43 लाख एक हजार 76 रुपये भांडवली नफा मिळेल. एकूण 2 कोटी 59 लाख 81 हजार 76 रुपयांचा निधी जमा होण्यास 35 वर्ष लागतील.
5000 रुपयांच्या एसआयपीनं अडीच कोटींचा कॉर्पस जमा होण्यास 33 वर्ष लागतील. एसआयपीद्वारे गुंतवणूकदाराला 1980000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यावर भांडवली नफा 2,34,89,990 इतका मिळेल. म्हणजेच त्याचा एकूण कॉर्पस 2,54,69,990 रुपये होईल.
टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही.)