जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । राज्यात ना. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट व भाजपचे सरकार स्थापन झाले असून या नवीन सरकारने अनेक कामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये जळगाव शहरातील (Jalgaon City News) कामांचा देखील सामावेश असून नवीन पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत ही कामे रखडली आहेत.
तसे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाला प्राप्त झाले आहे. राज्यात नवीन सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे पालकमंत्र्या अभावी अनेक विकास कामे खोळंबली आहेत. राज्यात मंत्रीमंडळ नसल्याची झळ आता स्थानिक स्तवरावर बसू लागली असून अनेक वर्षांनंतर होणाऱ्या रस्त्यांच्या कामांना पुन्हा ब्रेक लागल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
जिल्हा नियोजन विभागातर्फे महापालिकेस सन २०२२-२३ निधीची कामे थांबविण्यात यावीत.नवीन पालकमंत्री आल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पत्र जिल्हा नियोजन विभागाने महापालिकेस पाठविले आहे. त्यामुळे नवीन पालकमंत्री येण्याची आता प्रतिक्षा आ
शहरात विकासासाठी तसेच काही कामासाठी जिल्हा नियोजन (डीपीडीसी) मंडळाकडून निधी मिळत असतो. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतांत, त्यांच्याच मान्यतेने विविध विकास कामासाठी निधी मंजूर केला जातो. त्यानुसार तो वितरीत केला जातो. माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत जळगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे त्यातून ही कामे होणार होती, त्याचे नियोजनही महापालिकेतर्फे करण्यात आले होते.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज
