सिहोर : कुबेश्वर धाम येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर, रुद्राक्षसाठी १० लाखांहून अधिक भाविक पोहोचले

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२३ । मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेश्वर धाम येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. प्रशासनही वाढत्या गर्दीला बळी पडले आहे. साक्षात पंडित प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय शिव महापुराण कथा व रुद्राक्ष उत्सव सोहळा सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला जास्तीत जास्त 50 हजार लोक उपस्थित राहतील असा अंदाज प्रदीप मिश्रा यांच्या टीमने आणि प्रशासनाचा होता, मात्र आज कथेच्या पहिल्याच दिवशी जवळपास 10 लाखांहून अधिक लोक येथे पोहोचले आहेत.

रुद्राक्ष उत्सव सोहळ्यासाठी 2-2 किलोमीटर लांबच लांब रांग लागलेली पाहायाला मिळतेय. या रांगेत २ लाखांहून अधिक लोक होते. ही गर्दी रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले, तरी देखील ही गर्दी थांबू शकली नाही. गर्दी पाहता प्रशासनाचा बंदोबस्तही ढासळला आहे. प्रशासनाकडून भाविकांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आलेली नाहीय. यामुळे 10-10 तास उन्हात उभे राहिल्यानंतर चक्कर आल्याने लोक बेहोश पडलेय. जवळपास दोन हजार भाविकांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, रुद्राक्ष कार्यक्रमात सुमारे दहा लाख भाविकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे इंदूर-भोपाळ महामार्गावर ठप्प आहे. सुमारे 20 किलोमीटर जाम आहे. गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भांडणात महाराष्ट्रातून आलेल्या ५२ वर्षीय मंगलबाई यांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिहोर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दोन हजार लोक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहाहून अधिक महिला बेपत्ता आहेत.प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

एक दिवस आधी दोन लाख लोक आले होते
कार्यक्रमाच्या एक दिवस आधी बुधवारी दोन लाखांहून अधिक लोक येथे पोहोचले. भाविकांची वाढती गर्दी पाहता कार्यक्रमस्थळी एक दिवसापूर्वीच भाविकांना रुद्राक्षाचे वाटप सुरू करण्यात आले. गुरुवारी आठ लाखांहून अधिक लोक पोहोचले आहेत.

मोबाईल नेटवर्कही कोलमडले
भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलीस-प्रशासनाला बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत. त्यातच मोबाईल नेटवर्क कोलमडल्याने कुबेरेश्वर धाम येथे येणाऱ्या भाविकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. भाविक आप्तेष्टांपासून विभक्त होत आहेत.

पंडित मिश्रा यांचा रुद्राक्ष का आहे विशेष?
पंडित प्रदीप मिश्रा आपल्या कथांमध्ये रुद्राक्षाच्या महिमाची स्तुती करत असतात. त्यांच्या मते हा रुद्राक्ष पाण्यात टाकावा लागतो आणि ते पाणी प्यावे लागते. यामुळे सर्व समस्या दूर होतात. नक्षत्र अशुभ असेल तर ते बरेही होतात. आजारासह सर्व संकट दूर होतात.