⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | काय ते हाटील, काय ती महिला, काय तो Video.. भाजप नेत्याचा महिलेसोबतचा बेडरूम व्हिडीओ व्हायरल

काय ते हाटील, काय ती महिला, काय तो Video.. भाजप नेत्याचा महिलेसोबतचा बेडरूम व्हिडीओ व्हायरल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । राज्यातील सोलापूरमधील एका भाजप नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोलापूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (shrikant deshmukh) यांचा पीडित महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेने देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी आपल्याशी संबंध ठेवून आता आपल्याला धोका दिल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकारानंतर देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. मात्र, त्यामागे त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. हा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या काही दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी एका महिलेवर हनीट्रॅपचा गुन्हा दाखल केला होता. महिलेने ब्लॅकमेल करून दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महिलेने स्वतः हा व्हिडिओ व्हायरल केला
महिलेने स्वतः हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. ती स्वतः बेडरूममध्ये व्हिडिओ बनवते. यामध्ये श्रीकांत देशमुख हे बनियान परिधान केलेले दिसत आहे. श्रीकांत देशमुख यांच्याकडे बोट दाखवत महिलेने गंभीर आरोप केले. ती म्हणते की याने मला फसवले आहे. हाच श्रीकांत देशमुख, बायकोनंतरही माझ्याशी संबंध ठेवत असल्याचे ती सांगत आहे. .28 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण व्हिडीओत दोन वेळा हे संभाषण दाखवण्यात आलं आहे. 

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1933727986823054

 ही महिला रडत रडत तिच्यावरील अन्यायाची माहिती देत असताना देशमुख जागेवरून उठताना आणि या महिलेकडून कॅमेरा हिसकावून घेताना दिसत आहेत. त्यामुळे कॅमेरा हलला आहे. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली दिसत आहे.

महिला काय म्हणाली?

मला हा माणूस… (बोट दाखवत) याने मला फसवलंय. हा श्रीकांत देशमुख आहे. त्याने बायकोशी संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय हा. लग्न करतोय हा… (तेवढ्यात देशमुख जागेवरून उठले आणि त्यांनी शुटिंग बंद करण्याचा प्रयत्न केला) नाही… सोड सोड… तू आता बोलायचं नाही…सोड… आता बोलायचं नाही… तू माझ्याशी का खोटं बोलला? का खोटं बोललास…, असं म्हणताना ही महिला दिसत आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर भारतीय जनता पार्टी, सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून तो प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारला आहे. 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.