धक्कादायक : कोल्ड्रिंक्स पाजत महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ केले व्हायरल
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ ।जामनेर तालुक्यात राहणाऱ्या एका तीस वर्षीय महिलेला कोल्ड्रिंग पाजून तीन जणांनी अनैसर्गिक अत्याचार केला. या बाबद जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तीस वर्षीय महिलेवर सुमारे एक वर्षापूर्वी गोविंदा जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक या तीन जणांनी कोल्ड्रिंग पाजून जामनेर ते भुसावळ दरम्यानच्या एका हॉटेलवर नेऊन अनैसर्गिकरित्या अत्याचार केला.
यावेळी अनैसर्गिक अत्याचार करतांना मनीषा हिने विडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत पीडित महिलेने याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोविंद जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.