धक्कदायक : भुसावळच्या पोलीसांच्या हाताला तुरा देत कैदी फरार


जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ ।
एका कैद्याला पोलीस जिल्हा कारागृहात घेऊन चालले होते. यावेळी त्यांच्या हाताला झटका देवून वाशीम जिल्ह्यातील कैदी फरार झाला. हि घटना गुरुवारी १९ मे रोजी दुपारी घडली. याप्रकरणी फरार कैदी महेश शिवदास दीक्षे (वय-३०) याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैदी फरार jpg webp

अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेला कैदी महेश शिवदास दीक्षे (वय-३०) याची पुढील कारवाईसाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गुरुवार, दि. १९ मे रोजी भुसावळ येथून जळगाव येथील जिल्हा कारागृहात ट्रान्स्फर होण्यासाठी भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व पो.कॉ. ईश्वर संजय भालेराव शासकीय वाहनाने जिल्हा कारागृहात दुपारी १२ वाजता आणले होते.

कैदी महेश दिक्षे प्रभारी जेल अधीक्षक यांना कागदपत्र दाखवत कैदी हा वेडसर असल्याचे सांगत असतांनाच कैदी महेश दीक्षे हा पोलीस नाईक अमित तडवी यांच्या हाताला दिला. त्यानंतर तो सबजेल पोलीस लाईनच्या गल्लीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. भुसावळ पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. अखेर भुसावळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पोलीस नाईक अमित तडवी यांनी सायंकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून कैदी महेश शिवदास दीक्षे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now