महामार्गावर स्पीड ब्रेकर न टाकल्यास मंगळवारी रास्ता रोको

डिसेंबर 19, 2021 3:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । शहरातील सालार नगर चौपदरी मार्गावरील हलीमा अपार्टमेंट जवळ रॅम व स्पीड ब्रेकर न टाकल्यास मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना दिले आहे.

nivedan jpg webp

सविस्तर असे की, शहरातील इच्छादेवी ते अजिंठा चौक या चौपदरी महामार्गावरील हलिमा अपार्टमेंट लागून असलेल्या रहेमत,खदीजा, हलीमा,मालिक अपार्टमेंट्स सह सुमारे ४५० ते ५०० घरे असलेल्या नागरी वस्तीच्या शालेय विद्यार्थी,महिला,पुरुष व त्यांची वाहने ही वस्तीतून निघताच महामार्गाच्या ऍप्रोच रोडच्या माध्यमाने महामार्गाला लागतात परंतु ऍप्रोच रोडचे रॅम मागील दोन महिन्यापासून तयार करण्यात आले नाही वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा व झेंडू ठेकेदार कंपनीचे अजय वर्मा व सुजित सिंग हे प्रत्येक वेळी फक्त आश्वासन देत असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. व भविष्यात गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने वेळीच यावर उपाययोजना करण्यात यावी, असे जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दि.२० डिसेंबर पर्यंत सदर ऍप्रोच रोडवर रैम्प व स्पीड ब्रेकर न झाल्यास २१ डिसेंबर मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव, ठेकेदार कंपनी झेंडू व प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन शुक्रवारी दिले असून त्याच्या प्रति जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक ,सहाय्यक पोलीस अधीक्षक जळगाव भाग, आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.

निवेदनवार शेकडो लोकांच्या स्वाक्षऱ्या
निवेदनावर सालार नगर मधील हलीमा ,रहेमत,मालिक,सालेहा व इतर अपार्टमेंट सह सुमारे ३१५ घराच्या लोकांनी स्वक्षरी केलेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now