---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावात अवैध वाळू वाहतूक थांबता थांबेना!! 1300 ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । वाळू उपशाला बंदी असतांनाही वाळूची अवैध वाहतूक केली जाते. वेळोवेळी कारवाई होत असतानाही वाळूचा अवैध उपसा सुरूच आहे. गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतूक केली जाते. नुकतेच जळगाव शहरात १३०० ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त केला गेला आहे.

valu 1

जिल्हा प्रशासनाने कारवाई करून जवळपास १३०० ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. हा साठा अनेक दिवस पडून आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीशेजारी जवळपास ८५० ब्रास, एरंडोल येथे ३५० आणि धरणगाव येथे १०० ब्रास, असा एकूण १३०० ब्रास वाळूसाठा बरेच दिवस झाले पडून आहे.

---Advertisement---

त्यामुळे या साठ्याचा लिलाव करण्यासाठी डेपोचा प्रस्ताव शासनाला दिल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे या साठ्याच्या विल्हेवाटीसाठी डेपो पद्धत सुरू करून त्याचा लिलाव करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

या दरम्यान आज जिल्हा खनिकर्म समितीची बैठक होणार असल्याचेही समोर आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---