जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । रावेर तालुक्यातील एका गावातील एका २४ वर्षीय विवाहितेला अश्लील शिविगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात एका २४ वर्षीय विवाहिता मुलांना बिस्कीट घेण्यासाठी दुकानावर गेल्या., यावेळी संशयित आरोपी महादू सीताराम महाले याने महिलेच्या जवळ अश्लील संभाषण करत शिवीगाळ केली. पिडीत विवाहितेने विरोध केल्यावर तिच्या दिशेने वीट फेकून मारली. तसेच मी जेलमधून सुटून आल्यावर पहिले तुझा खून करेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी निंभोरा पोलिसात पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महादू महाले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स.फौ.राजेंद्र काशिनाथ पाटील हे करीत आहेत.