---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

धक्कादायक : विवाहितेचा संसार मोडण्यासाठी पतीसह नातेवाईकांना पाठविले अश्लील पत्र

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील जिल्हापेठ परिसरातील रहिवासी असलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेचा संसार मोडण्याच्या उद्देशाने कुणीतरी माथेफिरूने तिच्या पतीसह नातेवाईकांना पत्र पाठविले. पत्रात अश्लील मजकूर लिहून धमकी देण्यात आलेली आहे. पीडित महिलेने याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली असून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

354 vinaybhang jpg webp

शहरातील जिल्हापेठ परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहितेला त्रास देण्याच्या आणि तिचा संसार मोडण्याच्या उद्देशाने गेल्या चार वर्षापासून कुणीतरी वेळोवेळी तिच्या पतीसह नातेवाईकांना पत्र पाठवीत आहे. विवाहितेसोबत प्रेमसंबंध असल्याचे भासवून संबंधित व्यक्ती पत्रात उल्ल्लेख करीत अश्लील भाषेचा उपयोग करून शिवीगाळ आणि धमकी देत आहे.

---Advertisement---

२१ एप्रिल २०१८ पासून सुरु असलेल्या या प्रकाराविरुद्ध विवाहितेने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास महिला पोलीस नाईक भारती देशमुख या करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---