जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । दोन भावांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वहिनीला चाकूने वार करून जखमी केल्याची घटना रावेर तालुक्यातील आभोडा येथे घडली. या प्रकरणी येथील पोलिसांत दिरावर गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, आभोडा येथे वामन जगन वाघ हे पत्नी सविता वाघ यांच्यासह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी वामन जगन वाघ यांचे भाऊ बळीराम जगन वाघ यांचे कौटुंबिक कारणावरून घरात भांडण सुरू होते. पती व दिराचे भांडण पाहून सविता वाघ यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता. दिर बळीराम जगन वाघ याने तिक्ष्ण चाकूने वार करून सविता वाघ यांना जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात सविता वाघ या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रावेर रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सविता वाघ यांच्या फिर्यादीवरून बळीराम जगन वाघ याच्या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.