⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | जळगावात पुन्हा अपघात; कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

जळगावात पुन्हा अपघात; कारच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२४ । जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. तीन दिवसापूर्वी तरुणीसह महिलेला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना ताजी असताना आज शनिवार पुन्हा अपघात झाला आहे. भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली. यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

अजबसिंग नारायण पाटील (वय ७८, रा. द्वारका नगर, जळगाव, मूळ रहिवासी ता. यावल) असे मयत वृद्धाचे नाव असून या घटनेनंतर आहुजानगर जवळ संतप्त नागरिकांनी पूर्ण महामार्ग रास्ता रोको करून जाम केला आहे. प्रसंगी आता दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचरण करण्यात आले आहे.

या घटनेबाबत असे की, अजबसिंग पाटील हे द्वारका नगर येथे राहणाऱ्या मुलगीकडे राहत होते. तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्याच्या परिवारासह गावी यावल तालुक्यात येथे शेतीकाम करण्यासाठी राहत होता. आज सकाळी १० वाजेनंतर ते द्वारका नगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर बसण्यासाठी गेले होते. रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, तीन दिवसापूर्वी महामार्गावरील मानराज पार्क जवळ एका १७ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिलेला ट्रकने चिडल्याची घटना घडली होती. यांनतर आज झालेल्या या घटनेनंतर नागरिक प्रचंड संतप्त झालेले आहेत. परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.