⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोविड सेंटरमध्ये मद्यपीचा गोंधळ; महापौरांनी केली कानउघाडणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू, गुटखा न दिल्यास आत्महत्येची धमकी देणाऱ्याला महापौर भारती सोनवणे यांनी चांगलाच दम दिला.

मद्यपीकडून दारूच्या ४ बाटल्या, गुटखा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, मद्यपीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत असून महापौर रुग्णांची विचारपूस करीत असतात. बुधवारी अविनाश पाटील नामक एक मद्यपी गोंधळ घालत असल्याची माहिती महापौर सोनवणे यांना मिळताच त्या तात्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.विजय घोलप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मनपाच्या कोविड केअर सेंटर इमारत क्रमांक ४ मध्ये आईसह उपचारार्थ दाखल असलेल्या अविनाश पाटील या तरुणाने बाहेरून दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. तसेच मला दारू आणि गुटखा न दिल्यास मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी तो देत होता. महापौर भारती सोनवणे यांनी त्याला खाली बोलवत चांगलीच कानउघडणी केली. तसेच त्याच्या ताब्यातील ४ दारूच्या बाटल्या आणि गुटखा देखील काढून घेतला.

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या अविनाश अरुण पाटील याच्यासह कोविड केअर सेंटरच्या बाहेर जाऊन परत येणाऱ्या गजानन विजय काकडे, प्रसन्न प्रदीप सराफ यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात डॉ.विजय घोलप यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर भारती सोनवणे यांनी दिले आहे.