धक्कादायक : दारूच्या नशेत मुलासह पत्नीस मारहाण करून गालावर चावा घेतला!

ऑगस्ट 3, 2022 4:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । यावल शहरातील एका भागात पोटच्या मुलांसह पत्नीला दारू पिऊन मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 12T155737.257 jpg webp

मनीषा नामदेव कोळी यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. या विवाहिता पती नामदेव जगन्नाथ कोळी व मुलांसह यावल शहरातील विठ्ठल वाडी येथे वास्तव्याला आहे. पती नामदेव कोळी याला दारूचे व्यसन आहे. नेहमीप्रमाणे मंगळवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नामदेव कोळी हा दारूच्या नशेत आला. व त्याच्या मुलांना मारहाण करून शिवीगाळ करत होता. याबाबत पत्नी मनीषा कोळी यांनी जाब विचारला असता. रागात येवून नामदेव कोळी याने पत्नीला मारहाण करून गालावर चावा घेतला.

यासंदर्भात विवाहितेन यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती नामदेव जगन्नाथ कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बालक बाऱ्हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now