गुन्हेजळगाव जिल्हायावल

धक्कादायक : अज्ञात भामट्याने शेतकर्‍याच्या शेतातील चक्क १५०० केळीचे झाडे कापले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील बोरावल रोडवर शेतकरी भागवत सुपडू फालक ( वय ५९ ) यांच्या शेतातील १५०० केळीची झाडे कापून अज्ञात भामट्याने नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात भामट्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


सविस्तर असे की, शेतकरी भागवत सुपडू फालक (५९, रा.महाजन गल्ली, यावल) यांनी चार वर्षांपूर्वी चितोडा, ता.यावल येथील छगन कडु चौधरी यांच्यासह इंदुबाई रवींद्र करांडे यांचे यावल शिवारातील भालशिव रस्त्यावरील शेती क्र. १२६ ही शेतजमीन निमबटाईने करीत आले आहेत. या शेतामध्ये सध्या केळीचे पीक लावण्यात आले असून त्यात घड लागले आहेत. मात्र २० जानेवारी रोजी सकाळी ९:०० वाजता भागवत फालक हे त्यांचा मुलगा कल्पेश फालक सोबत गेले असता केळीवर फवारणी करीत असतांना त्यांना केळीच्या झाडावरील सुमारे ४० हजार रुपये किंमतीचे १५०० केळी झाडे अर्धवट कापलेल्या अवस्थेत दिसुन आले. फालक यांनी आपले सहकारी छगन चौधरी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. फालक यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात भामट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सहकारी पीक संरक्षक सोसायटीच्या वतीने संदीप डिंगबर फालक व रवींद्र रमेश धांडे यांच्या समक्ष केळी पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

Related Articles

Back to top button