जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । शहरातील एका भागात माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेला लग्नात हुंडा कमी दिला म्हणून माहेरहून पाच लाख रुपये आणावे आणि गर्भपात करावा असा दबाव टाकून जीवेठार मारण्याची धमकी देत छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १५ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दादावाडी येथील माहेर असलेल्या जयश्री आशिष पवार (वय २४) यांचा विवाह धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील आशिष प्रभाकर पवार यांच्याशी रितीरिवाजानुसार २६ डिसेंबर २०२१ रोजी झाला. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर पती आशिष पवार याने विवाहितेला लग्नाबद्दल टोमणे मारणे सुरू केले. लग्ना हुंडा कमी दिला म्हणून माहेरहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही. म्हणून तिचा छळ केला. तसेच विवाहिता गर्भवती असतांना गर्भपात करण्यासाठी सासरच्या मंडळींनी तगादा लावला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी दादावाडी येथे निघून आल्या. त्यांनी शनिवार १५ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती आशिष प्रभाकर पवार, सासु सट्बाई प्रभाकर पवार, जेठ किशोर प्रभाकर पवार, जेठाणी अमृता किशोर पवार आणि नणंद कविता पंकज साळुंखे सर्व रा. नांदेड ता. धरणगाव जि. जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर करीत आहे.