धक्कादायक : पारोळा-भडगाव रस्त्यावर पेटली कार, तरुण जळून खाक

डिसेंबर 31, 2021 12:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील पोपटनगर गावाजवळ गुरुवारी दुपारी 3 वाजता एका कारने अचानक पेट घेतला. घटनेत वाहन चालक तरुणाचा कारमध्येच जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

burnt car

याबाबत संजय अजबसिंग पाटील यांनी पारोळा पोलिसात माहिती दिली की, त्यांना पोलीस पाटील रेखा पाटील यांचा फोन आला की मुलगा शुभम संजय पाटील हा कारमध्ये जळून मृत्युमुखी पडला आहे. या बाबत पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुधीर चौधरी करत आहे. कारमध्ये जळून तरुणाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

    Join WhatsApp

    Join Now

    Join Telegram

    Join Now