⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडेंविरोधात भाजपकडून तक्रार दाखल ; नेमकं प्रकरण काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२३ । ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्याविरोधात भाजपकडून (BJP) भोईवाडा पोलीस ठाण्यात (Bhoiwada Police Station) तक्रार दाखल करण्यात आलेली. भाजपाच्या सोशल मीडिया आणि कायदेशीर सल्लागार सेलचे प्रमुख आशुतोष दुबे (Ashutosh Dube) यांनी ही तक्रार दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?
दादर (Dadar) येथे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेब, ब्राह्मण आणि पेशव्यांवर उघडपणे वक्तव्य केली. दुसऱ्या बाजीरावाने महाराष्ट्र इंग्रजांच्या हातात सोपवला, असे नेमाडे म्हणाले. औरंगजेबाला दोन हिंदू राण्या होत्या. त्या काशीला गेल्या होत्या, त्यावेळी हिंदू पंडितांनी त्यांचं अपहरण करून त्यांना भ्रष्ट केलं. म्हणून औरंगजेबाने मंदिर फोडली, अशी वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केली होती.

यानंतर भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपा नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला व आता तक्रार नोंदवली आहे.

आशुतोष दुबे यांनी भालचंद्र नेमाडे यांच्यावर हिंदू ब्राह्मणांच्या भावना दुखावण, लोकांना चिथावणी देणं आणि सार्वजनिक सदभावना बिघडवल्याचा आरोप केला आहे. भारतीय दंड विधान संहितेच्या कलमातंर्गत योग्य ती कारवाई करण्याची विनंती त्यांनी मुंबई पोलिसांना केली आहे.