दुचाकी चोरटे एक वर्षांनी गजाआड, फिर्यादी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले!

जुलै 27, 2022 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । आव्हाने येथे शेतात शेतकरी काम करत असताना बांधावरील त्यांची दुचाकी शिताफीने चोरट्यांनी चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होता. अखेर त्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक वर्षानंतर अटक केली आहे. दिपक भास्कर सपकाळे व राजु बुधो सपकाळे (दोघे रा. धामणगाव ता.जि.जळगाव) असे अटकेतील दोघांचे नावे आहेत. दरम्यान, चोरटे आणि मोटार सायकल सापडल्याने फिर्याद दाखल करणाऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे.

crime 2022 07 27T104734.693 jpg webp

तसेच चोरीला गेलेल्या मोटार सायकलचा शोध लागल्याने फिर्यादी शेतक-याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाचे आभार मानले आहे. अरुण देवराम चौधरी रा. आव्हाणे ता. जळगाव हे त्यांच्या भावाची मोटार सायकल शेतात ये जा करण्यासाठी वापरत होते. 1 नोव्हेंबर 2021 रोजी ते मोटार सायकलने शेतात गेले होते. शेताच्या बांधावर मोटार सायकल उभी केली असतांना दिपक भास्कर सपकाळे व राजु बुधो सपकाळे या दोघा चोरट्यांनी त्यांची मोटार सायकल चोरुन नेली होती. दोघेही पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहेत.

या घटने प्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुरनं 297/2021 भादवि 379, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, भारत पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपासकामी अटकेतील दोघांना जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now