---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र विशेष

स्व.आनंद दिघे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाते काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेताना स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच स्व.आनंद दिघे यांचे नाव घेणारे मंत्री म्हणजे ना.एकनाथ शिंदे. ठाकरे सरकारमधील प्रति मुख्यमंत्री समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे आणि स्व.आनंद दिघे यांचे नातं काय असा प्रश्न अनेकांना पडतो. स्व.आनंद दिघे यांच्या जीवनकार्याला उजाळा देणारा धर्मवीर मु.पो.ठाणे हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात रिलीज होणार त्यानिमित्ताने पुन्हा एकदा दिघे आणि शिंदेंबद्दल चर्चा होऊ लागली आहे. धर्मवीर आनंद दिघे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नात्याबद्दल घेतलेला हा खास आढावा.

shivsena thane anand dighe and eknath shinde

ज्या महानगरपालिकेमध्ये खुद्द पंतप्रधान जरी महापौरांच्या पदासाठी लढले तरीदेखील शिवसेनेला हरवू शकत नाही अशी महानगरपालिका म्हणजे ठाणे महानगरपालिका. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या ४० वर्षांपासून त्या ठिकाणी फक्त शिवसेनेचाच भगवा फडकतो आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आत्ताच आलेली मनसे, असे कित्येक पक्ष आले ठाण्यात पकड जमवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि वाऱ्यासारखे उडून गेले, त्यामागे एकाच कारण म्हणजे शिवसेनेचे वादळ. ठाण्यात शिवसेनेचे वादळ निर्माण करण्यासाठी ज्यांनी नेतेच नव्हे तर तळागळातील कार्यकर्त्यांनाही उभे केले आणि त्याच कार्यकर्त्यांना नेते बनवनले ते म्हणजे धर्मवीर स्व.आनंद दिघे.

---Advertisement---

शिवसेनेचा आधारस्तंभ स्व.आनंद दिघे यांना जाऊन आज वीस वर्ष पूर्ण जरी होत असली तरी देखील आनंद दिघे यांच्यावरच प्रेम कमी झालेलं नाहीये. आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई, ठाण्यात आहे. पक्षातील अशाच एका कार्यकर्त्याला एका साध्या शिवसैनिकाला आनंद दिघे यांनी नगरसेवक, शिवसेना सभापती, सभापती ते थेट शिवसेना नेतेपद दिलं ते म्हणजे आजचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. शिवसेना ‘चालवणारे’ प्रति मुख्यमंत्री म्हणून आज एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या रूपाने आज स्व.आनंद दिघे यांना पहिले जाते.

१९९० चा काळ होता एकनाथ शिंदे हे साधे रिक्षाचालक होते. रिक्षा चालविताना त्यांना आनंद दिघे या माणसाचा मोह झाला होता. आनंद दिघे ज्याप्रकारे संघटन चालवतात त्या संघटन एवढे त्यांना काम करायचे होते. म्हणून ते बिजू नाटेकर या रिक्षा युनियनमध्ये सहभागी झाले. त्यानंतर किसननगर या भागांमध्ये त्यांनी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रभाव वाढू लागला होता आणि नेमकी हीच बाब आनंद दिघे यांनी हेरली होती. एकनाथ शिंदेंच्या कामावर खुष होत १९९७साली आनंद दिघे यांनी त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे तिकीट दिले आणि ते निवडूनही आले.त्या नंतर दिघे यांनी शिंदेंना ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेपदही दिले. अशाप्रकारे एकनाथ शिंदे यांना आनंद दिघे यांनी शिवसेनेचा ‘नेता’ केले.

.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---