⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

शिवाराला लागली आग आणि लाखोंचा मका झाला खाक


जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ ।
एरंडोल तालुक्यातील फरकांडे शिवारामधील शेतातील मक्याच्या पिकाला अचानक आग लागली. हि आग इतकी तीव्र होती कि शेकऱ्याचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे .

शांतराम गोविंदा चव्हाण (फरकांडे, ता.एरंडोल) यांचे फरकांडे शिवारात गट नंबर 57 मध्ये शेत असून गुरुवार, 19 मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील मक्याला अचानक आग लागल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले. याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात शांताराम चव्हाण यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार युवराज कोळी करीत आहे.

शांतराम गोविंदा चव्हाण हे शेती करून आपले कुटुंब चालवतात. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे शेताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या झालेल्या नुकसानाची त्यांना भरपाई मिळावी अशी परिसरातल्या नागरिकांची इच्छा आहे.