---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड महाराष्ट्र राजकारण

खडसेंनी केला शिवसेनेचा दारुण पराभव !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | सुभाष धाडे | बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रणीत पॅनलने दणदणीत विजय मिळावा आहे. पर्यायी आमदार चंद्रकांत पाटील यांना जोर का झटका बसला आहे.

गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून बाजार समिती ही भाजपकडे होती. मात्र आता ती खडसेंनी आपल्या जोरावर राष्ट्र्रवादीकडे आणली आहे. त्यांनी चंद्रकांत पाटलांचा दारुण पराभव केला आहे.

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती हि तीन तालुक्यांची एकमेव बाजार समिती आहे. यामुळे हि निवडणूक फार महत्वाची असते. या निवडणुकीत खडसे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी लढली तर चंद्र्कांत पाटील यांच्या नेतुत्वात शिवसेना लढली.

दीच्या पॅनलने १८ पैकी तब्बल १७ जागा जिंकून दणदणीत विजय संपादन केला. तर महायुतीच्या पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे एकनाथराव खडसे यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का बसला आहे.

khadse jpg webp

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---