जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य प्रवीण फालक, तंत्रनिकेतने समन्वयक प्रा. दीपक झांबरे, अधीष्ठाता डॉ. हेमंत इंगळे व सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयातील प्रा. रुचिता बारी यांनी शिवचरित्राच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास उलगडला. शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन प्रा. नकुल गाडगे यांनी केले.