किनगाव येथील शेजमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

ऑक्टोबर 14, 2021 10:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव येथील शेजमजूराने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी उघडकीस आलीय. राजु रामसिंग कोळी (वय-४७) असे या आत्महत्या केलेल्या शेतमजूरचे नाव आहे. दरम्यान मागील तीन दिवसात किनगाव गावातील एकाच गल्लीतील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

kingaon raju koli jpg webp

किनगाव येथील शेतमजूर राजु कोळी हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आज गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी राजू कोळी यांची पत्नी शेतात कामाला गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने घर बंद करून छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

मयताचा मोठा भाऊ अशोक कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मागील तीन दिवसात किनगाव गावातील एकाच गल्लीतील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now