जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । पैसे दिले नाही म्हणून “बलात्काराचा गुन्हा दाखल करून बदनामी करू” अशी धमकी दिल्याने तरुणाने भीतीपोटी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक समोर आली आहे. या प्रकरणी ६ जणांविरोधात चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहिद मुन्ना शेख (वय २०) रा. चोपडा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शाहिद मुन्ना शेख हा आपल्या कुटुंबियांसह चोपडा शहरात वास्तव्यास आहे. त्याची ओळख शहरातील जरीनाबी मुनसफ शेख हिच्याशी झाला. दरम्यान दोघांची मैत्री असल्यामुळे याचा गैरफायदा घेत जरीनाबी मुनसफ शेख हिने शाहिद मुन्ना शेख याला २० हजार रुपयाची मागणी केली. दरम्यान शाहिदने २० हजार रुपये दिले नाही म्हणून जरीनाबी हिने शाहीदला धमकी देत “तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून, तुझी बदनामी करू” अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरून शाहिद मुन्ना शेख याने २२ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान याप्रकरणी शाहीदचे वडील मुन्ना लतीफ शेख यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जरीनाबी मुनसफ शेख गुलाम रेतीवाले दोन्ही रा. चोपडा, रुकसाना बी शेख हसन, शेख गुड्डू शेख गुलाब, शेख काल्या शेख गुलाम, वसीम शेख माजिद शेख सर्व रा. अडावद तालुका चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.