Sunday, December 4, 2022

Share Market News : सलग तिसऱ्या दिवशी सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्ससह निफ्टी घसरली

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । भारतीय शेअर बाजारातील (Share Market) घसरण थांबता थांबत नाहीय. आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण दिसून आलीय. जागतिक बाजारातील मंदीचे संकेतामुळे आज बुधवारी व्यापार सत्राच्या सुरुवातीला, 30 अंकांचा सेन्सेक्स किंचित घसरणीसह 52,650.41 वर उघडला. त्याच वेळी, 50 अंकांचा निफ्टी 15,729.25 वर उघडला. मात्र, सुरुवातीला त्यातही थोडी घट झाली. Share Market Update News

- Advertisement -

काही वेळाने शेअर बाजार वधारला
प्री-ओपन सत्रादरम्यान, सेन्सेक्सचे 10 समभाग लाल चिन्हांसह व्यवहार करत होते. बाजार उघडल्यानंतर काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या चिन्हांसह व्यवहार करताना दिसले. टाटा मोटर्स, टाटा स्टील, बजाज फिनसव्ही, एम अँड एम आणि ग्रासीम हे निफ्टीचे टॉप गेनर्स होते. दुसरीकडे, RELIANCE, HDFC, HINDUNILVR, BRITANIA आणि BHARTI AIR TEL हे सर्वाधिक तोट्यात होते.

जागतिक बाजारातून संमिश्र संकेत
दुसरीकडे जागतिक बाजारातून संमिश्र संकेत दिसत आहेत. सलग पाचव्या दिवशी डाऊ जोन्समध्ये घसरण झाली आणि तो 150 अंकांनी घसरून बंद झाला. शेवटच्या ट्रेडिंग तासात Nasdaq ने किंचित वाढ पाहिली. आयटी समभागातील रिकव्हरीमुळे बाजार मजबूत झाला आहे. युरोपीय बाजारांनी 0.5 ते 1 टक्क्यांची घसरण नोंदवली. याशिवाय आशियाई बाजारातही मंदीचे व्यवहार दिसून आले.

- Advertisement -

मंगळवारी शेअर बाजाराची स्थिती
तत्पूर्वी, सलग तिसऱ्या दिवशी प्रमुख शेअर बाजार घसरणीसह बंद झाले आणि 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. मंगळवारच्या व्यापार सत्रात, बीएसई सेन्सेक्स 153 अंकांपेक्षा अधिक घसरून 52,693.57 वर बंद झाला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 42.30 अंकांनी घसरून 15,732.10 वर बंद झाला.विक्रीमुळे बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे.

- Advertisement -
[adinserter block="2"]