जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२४ । सध्या भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत असून आज प्री-ओपनिंग सत्रात मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअरच्या सेन्सेक्सने इतिहास रचला. 300 अंकांच्या जोरदार उसळीसह सेन्सेक्स पहिल्यांदाच 80 हजारांच्या पार गेला.
या महिन्याच्या अखेरच्या सत्रात केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्यापूर्वी शेअर बाजाराने धुवांधार बॅटिंग केली. मागील काही दिवसापासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होताना दिसत असून यामुळे नवीन रेकॉर्ड केले. बीएसई सेन्सेक्सने 364.18 अंकाची कमाई केली. त्यामुळे सेन्सेक्स 79,840.37 अंकावर उघडला. एनएसई निफ्टी 86.80 अंक वा 0.36 टक्क्यांसह उसळला. निफ्टी 24,228.75 स्तरावर पोहचला.